Ather 450X Electric Scooter: नमस्कार मित्रांनो, भारतीय बाजारात आजच्या काळामध्ये खूप साऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर च्या कंपन्या उपलब्ध आहेत, परंतु सर्वात मोठ्या कंपन्या पाहायला गेलं तर ओला आणि बजाज यासारख्या कंपन्यांना टक्कर देणारी Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर ची लोकप्रियता आता खूप प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे.
जर तुम्ही या स्कूटरला खरेदी करू इच्छित असाल आणि तुमच्याकडे जर कमी बजेट असेल तर आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण तुम्ही या गाडीवरती फायनान्स ची मदत घेऊ शकता. फायनान्स केल्यानंतर तुम्हाला ही गाडी घरी नेण्याकरिता फक्त 15000 रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे.
Ather 450X ची किंमत
आज पासून काही दिवसांपूर्वीच या कंपनीद्वारे या इलेक्ट्रिक स्कूटर ला भारतीय बाजारामध्ये लॉन्च केली गेली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर आत्ताच्या वेळेत आपल्या आकर्षक डिझाईन आणि ॲडव्हान्स फीचर्स तसेच दमदार परफॉर्मन्समुळे आणि कमी किमतीमध्ये ज्यादा रेंज देणारी असल्या कारणामुळे आता ही स्कूटर लाखो लोकांच्या मनामध्ये राज्य करत आहे.
जर या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर ही इलेक्ट्रिक स्कूटर गाडी भारतीय बाजारामध्ये 1.43 लाख रुपये च्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. Ather 450X Electric Scooter
Ather 450X वरती EMI प्लान
जर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल आणि तुमच्या जवळ बजेट कमी असेल तर तुम्ही खूप सरळ आणि साध्या पद्धतीने याच्यामध्ये फायनान्स चे सहकार्य घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 हजार रुपयापर्यंत डाऊन पेमेंट करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला बँकेकडून पुढील तीन वर्षाकरिता 9.7% व्याजावर बँकेकडून त्वरित लोन मिळेल.
या कर्जाची परतफेड करण्याकरता तुम्हाला 36 महिन्यापर्यंत बँकेला प्रत्येक महिन्याला 4288 रुपये म्हणजेच दरमहा ईएमआय चे हप्ते जमा करावे लागणार आहेत. Ather 450X Electric Scooter
Ather 450X चा दमदार परफॉर्मन्स
तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटर ला ईएमआय वरती कशाप्रकारे प्लान करू शकता आता आपण या गाडीमध्ये मिळणारे दमदार परफॉर्मन्स आणि ॲडव्हान्स फीचर्स बद्दल सांगणार आहोत. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ॲडव्हान्स फीचर्स च्या बरोबरच कंपनीने यामध्ये 3.7 KWH क्षमता असलेली लिथियम आयन बॅटरी चा उपयोग केला आहे.
त्याचबरोबर या स्कूटरमध्ये पावरफुल इलेक्ट्रिक मोटर देखील मिळत आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज झाल्यानंतर या इलेक्ट्रिक स्कूटर वरती तुम्ही कमीत कमी 150 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकता. फक्त एका चार्जे मध्ये या गाडीमध्ये 150 किलोमीटर पर्यंतची रेंज देणारी क्षमता पूर्णपणे सक्षम होते.